सांगू कशी मी बाई
कसं, कळलंच नाही
येळ सरना ह्यो भारी
जीव जीवाला खाई
त्याला जपलं मी फार
दिलं काळजात घर
आणि मिरविलं जगी
आज, गुमला चंद्रहार
दागिना महाग दिलेला
पारखून घडलेला
अर्धा सख्याचा, माझा
त्यात जीव जडलेला
मागं, उतरल्या पायी
सखा वळूनिया जाई
काळजात लक्क माझ्या
आज ईपरीत होई
काय अवदसा झाली
कुठ हरवायला गेलेली
बाई मी आतल्या आत
काकुळतीला आलेली!
असा गेला, असा आला
सख्या हासत, उधळत
नवा साजिरा लक्ष्मीहार
बाई, त्याच्या ग हातात!
- संदीप चांदणे (७/२/२०१७)
No comments:
Post a Comment