Friday, April 25, 2025

पापणी

लवलवती पापणी...
अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली
आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली
...लवलवती पापणी

थरथरती पापणी...
अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली
सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली
...थरथरती पापणी

झरझरती पापणी...
अविश्रांत असा, झरा वाहता झाली, 
पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली
...झरझरती पापणी

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, २५/०४/२०२५)

अशाच एका संध्याकाळी

अशाच एका संध्याकाळी
उन्हं व्हावीत सोनेरी
आणि चकाकून जावीत
ढगांच्या रूपेरी झालरी

अशाच एका संध्याकाळी
ह्र्दय भरून यावे
सुगंधी, मधुर, वाऱ्याला
उचलुनि कडेवर घ्यावे

अशाच एका संध्याकाळी
मनी आनंद फुलावा
पहिल्या पावसातला
हिरवाकंच अंकुर व्हावा

- संदीप भानुदास चांदणे (सोमवार २५/०४/२०११)

जागृत सत्य

इतिहासात काय
वर्तमानात काय
किंवा भविष्यात काय
हे आहे असंच राहणार

बळी कान पिळणार
दुबळे भरडले जाणार
येनकेन प्रकारे सारे 
सत्तेसाठी होत राहणार

न्याय न्याय म्हणतात तो 
व्यक्ती, समूह, प्रांत, भाषा
इत्यादी सापेक्ष असतो
तो तसाच मिळत राहणार

काळावर छाप सोडणारी
काही कल्पतरूही डोलतात
कालांतराने मात्र त्यांच्यावरची
बांडगूळंच शिल्लक राहणार

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, २५/०४/२०२५)

नरो वा कुंजरो वा

नरो वा कुंजरो वा

पोटाची खळगी भरणे कारणी
स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी

हसणे होईल पातक घोर
भवती मूर्खांचा वाढेल जोर

सत्य नित्य नको ओठी
वाचेत मुग्धतेची पराकोटी

आणि...

मती निकामी होय तेधवा
म्हणावे, नरो वा कुंजरो वा

- संदीप भानुदास चांदणे (रविवार, १०/०३/२०१९)

गर्भार सातव्या महिन्याची

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!


- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, ०१/०८/२०१८)

ललित लेखन


कल्पनाशक्ती ही कुणाची मक्तेदारी नसते. तशी ती सर्वांकडे असते पण काहीजणच तिला जपतात, फुलवतात. लहानपणी ती सर्वाधिक प्रमाणात स्त्रवते. कारण वास्तवाची तेवढी जाणीव त्यावेळी नसते. मोठेपणीचे ताणतणाव तेव्हा नसतात. या गोष्टींवर अलीकडेच मला नव्याने बोध झाला. 


आज रविवार... उशीरा उठायचं असं ठरवूनच रात्री झोपलेलो. पण नेहमीप्रमाणे सकाळीच आई आणि बायको असा दोन्हीकडून गोळीबार सुरू झाल्यावर पर्याय नव्हता. अजून सूर्यही उगवलेला नव्हता. बाल्कनीतून बाहेरचा परिसर शांत आणि आल्हाददायक वाटत होता. (आजकाल बाल्कनीतच झोपतोय मी) त्या क्षणी मनात विचार आला की मी तर राजा आहे, माझे घर हे माझे साम्राज्य आहे. आणि ही आजूबाजूची राज्ये. माझ्या साम्राज्यातून मी कुठेही बघू शकतो. कितीही वेळ. आणि माझ्या साम्राज्यात हवा तसा फिरू शकतो. आणि त्या वेळेला चक्क मायमराठीने पाठ फिरवून इंग्रजी भगिनीला माझ्याकडे धाडले आणि मग इंग्रजीतून ह्या ओळी स्फुरल्या:

I am the king, though, not wearing a crown
ready to take another quiet day of lockdown

birds are chirping and sun is rising as usual
me enjoying, sitting in balcony, being casual

forgotten all the pretty leisures of my life
forgotten drinks, drinking tea, brought by wife

time is passing, though, clocks are shutty
fading the glow and charm from the beauty

this phase shall pass, the mind always says
for the unknown future, present always pays


- संदीप भानुदास चांदणे (१०/०५/२०२०)


कितीतरी वेळा असं होतं. सायंकाळचा वारा मोठमोठ्याने गाणं म्हणायला सांगतो. जसाजसा सूर्य डोंगराआड जाऊन प्रकाश कमी होतो आणि हवेतला गारवा गुलाबी होत जातो तेव्हा तोच वारा सावकाश पण आर्त असे काही गायला लावतो. अंधाराची मात्रा वाढते तसा किती नाही म्हटलं तरी उदासपणा दाटतोच. मग कुठलीशी सल अजून हळुवार गुणगुणायला लावते. अशा वेळी जर जवळ मित्र असेल तर मैफल रंगते. दु:खाचीही गाणी होतात. कुणी जवळ नसल्यावर मात्र तो अंधार आणि ती रात्र खायला उठते.

- संदीप भानुदास चांदणे (१०/०५/२०२०)


लहान मुलांना पाहणं, खेळताना पाहणं हे खूप मजेशीर आणि आनंददायक असतं. त्यांनी खेळताना आपल्या कल्पनाशक्तीने त्यांना हव तसं जग निर्माण केलेलं असतं आणि त्यात ते सारं विसरून समरसून जगत असतात. कधीकधी त्यांच्याही नकळत, निरागसपणे ती असं काही बोलत रहातात की आपल्याला आश्चर्य वाटावं की अरेच्चा हे कुठे ऐकलं किंवा पाहिलं असेल यांनी. त्यांच्यासोबतचे सगळे क्षण म्हणजे जणू आयुष्यातल्या रणरणत्या उन्हात मिळालेली गारेगार सावलीच.
शेजारच्यांची लहान मुलं. जवळच्या नात्यातली लहान मुलं यांनी मला भरभरून आनंद दिलेला आहे. अजूनही देत आहेत. लहान मुलांसोबत खेळायला मी कधीही तयार असतो. आता माझ्या मुलींनी माझ्या आयुष्याचा ताबा घेतलाय.

- संदीप भानुदास चांदणे (१२/०५/२०२०)


पसारा आवरायचा एक दिवस येतोच. कपाट, त्याचं ड्रॉवर, पुस्तके, फाईली किंवा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेले फोटो. पसारा आवरून तो पुन्हा नीट लावताना तासन् तास कसे निघून जातात ते कळत नाही. हे नेहमीच होतं.

आज हार्डडिस्कमध्ये नवे फोटो टाकून ठेवायचे होते म्हणून हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. फोटोंच्या फोल्डर मध्ये गेलो. तिथं मी एक अनसॉर्टेड नावाचं फोल्डर करून ठेवलेलं आहे. ज्यात मी भराभर आधी सारं टाकून घेतो आणि नंतर सावकाश त्या त्या प्रसंगानुसार, कार्यक्रमानुसार, तारखांनुसार पुन्हा त्यांना योग्य जागी लावून ठेवीत असतो. परंतु, बर्‍याच वर्षांत अनसॉर्टेड मध्ये फक्त भरणाच झाला आहे. सॉर्टिंग असं करताच नाही आलं. त्याच कारण म्हणजे मोबाईलने काढलेले भरमसाठ फोटोज आणि व्हिडिओज.

हे फोटो पाहिले तर एखाद्याला वाटेल की च्यामारी, ह्याला तर आयुष्यात काहीच कष्ट पडले नसतील. आयुष्याचं सोपंसच गणित याच्या वाटेला आलंय. लहानपणासून ते आतापर्यंत चांगलं सुखासीन आयुष्य जगत आलेला आहे हा. अर्थातच ते खूपसं चूक आणि काही अंशी खरंही आहे. पण फोटो तर वेगळीच कहाणी सांगत आहेत. मग विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या लक्षात वेगळं राहतं आणि कॅमेर्‍याच्या वेगळं. पण एक गोष्ट नक्की, खूप काही बघून, फिरून, मजा करूनही झालेली आहे. जितके फोटो, व्हिडिओ आहेत तेवढे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येऊन गेलेलेच आहेत. या वेळी तुकारामबुवांची सुख पाहता जवापाडे, दु़:ख पर्वताएवढे या उक्तीचा नव्याने साक्षात्कार झाला! मनोमन तुकारामबुवांना नमस्कार केला आणि पुन्हा कधीतरी आवरूया म्हणून लॅपटॉप बंद केला.

- संदीप भानुदास चांदणे (१२/०५/२०२०)


तू त्यावेळी बोलत नसली तरी तुझं बोलणं शरीराच्या रोमारोमातून व्यक्त व्हायचं.

तुझे भिरभिर डोळे आणि त्यातली बेचैनी. बाहेर डोकावणार्‍या थेंबाना पापण्यांच्या कडांवर कितीतरी वेळ अडवून धरणं, त्यांना बाहेर पडू न देणं, हे कसं जमायचं ते तुझं तुलाच ठाऊक पण ते दिसायचं मला. केसांच्या बटा कितीतरी वेळा कानाच्या मागे खोचायचीस पण त्याही सारख्या निसटून वार्‍यावर उडत, कधी डोळ्यांवर तर कधी गालावरून हनुवटीच्या खालीपर्यंत वेढा टाकून बसायच्या. पायाचा अंगठाही मातीशी अविश्रांत बोलत रहायचा.

मावळतीकडे, डोंगरांच्या आड सूर्य गेल्यावर सभोवताली मंद संधिप्रकाश पसरून वार्‍याला जेव्हा शब्द फुटायचे तेव्हा ते गुंग होऊन ऐकत असतानाच अचानक तुझी निघायची सूचक हालचाल जाणवली की काळजात धस्स व्हायचे. झंकारणार्‍या वीणेची तार अचानक तुटल्यावर होते तसेच. तो कंप नकोसा वाटतो.

आजही तुझ्या नि माझ्या त्या अबोल भेटीचे गाणे एखाद्या सायंकाळी आठवते आणि मी ते गुणगुणत बसतो.

- संदीप भानुदास चांदणे (१७/०५/२०२०)


असं म्हणतात रात्रीच्या अंधारात चोर, लुटारू घराबाहेर पडतात.
पण इथे, दिवसाढवळ्या, जर कोणी अतीव सुंदर डोळ्यांच्या भुलीत पाडून लुटत असेल तर...
...तर आम्ही सर्वस्व लुटायला तयार आहोत!

- संदीप भानुदास चांदणे (२३/०५/२०२०)


शांतपणे किनाऱ्यावर बसून लाटा बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. काही लाटा सरावल्याप्रमाणे येत राहतात एकामागून एक आणि मध्येच एखादी असते जिला इतरांपेक्षा स्वतःला वेगळं दाखवायचं असतं. आपल्या क्षणभंगुर आयुष्याला उंच उठून वाकुल्या दाखवत किनाऱ्याच्या आणखी जरा जवळ येऊन ती आपलं वेगळेपण सिद्ध करते आणि पुन्हा विरून जाते. आपल्या आयुष्यात येणारी काही माणसंही अशीच लाटांसारखी असतात. काही सरधोपट तर काही उंच उठून वेगळं आयुष्य जगणारी.

- संदीप भानुदास चांदणे (२४/०५/२०२०)


उन्हीं पुराने दोस्तो के साथ
फुर्सत से गप्पे लडाने है
और उनके सुस्त पडे
ठहाके जगाने है
आसमां को सुनाने के लिए
चाय की सुर्कीया
उसी दूरके ठेलेपे जाके
लेनी है
फिर चाहे,
झुलसा देनेवाली
दोपहरकी धूप हो,
या हो,
शाम के रंगीन फव्वारे
क्रिकेट भी खेलना है
जहाँ जगह मिले वहाँ
बच्चोंको घुमाना है
बहन-भांजे सबसे
मिल आना है
जिंदगी फिर एक बार
और बेहतर तरीके से जिने की
कोशीश करनी है
बस ये,
साफ फर्श पर अचानक
हाथो से चाय की प्याली गिरी हो
और उसमे रख्खी हुई
सारी चाय फैल रही हो
तितर बितर होकर
जरासी भी ढलान मिले
उस ओर
उसी तरह से,
बढता हुआ ये
सुहाने जिंदगीपर
भद्दा दाग लग रहा लॉकडाऊन
पूरी तरह से
साफ हो जाने के बाद!

- संदीप भानुदास चांदणे (३१/०५/२०२०)


निवांत वेळ असताना अमुक गोष्ट करू असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यातल्या फार कमी लोकांना ते जमतं. खूप लोकांना ते नाही जमत. त्या खूप मधलाच मीही. निवांत वेळ असताना, मित्रांना फोन करू, एखादे चित्र काढायला घेऊ, काहीतरी नवीन लिहायला घेऊ, वाचायला घेऊ, बघायला घेऊ, वाजवायला शिकू, नवीन भाषा शिकू, पाहुण्यांपैकी कुणाकडे जाऊ, लांब कुठेतरी फिरायला जाऊ, अशी बरीच यादी माझ्याकडची मोठी आहे. प्रत्यक्षात निवांत वेळी कंटाळा आणि आळसच अंगात ठाण मांडून बसतात. काही सुचत नाही नेमकं काय करावं. आणि अशा वेळी विनाकारण काहीतरी करायला घेऊन नसते उद्योग केल्याची जाणीवच जास्त होते. त्यापेक्षा नकोच तो निवांत वेळ!


- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २०/१२/२०२२)


संध्याकाळ होते म्हणजे नेमकं काय होतं तर, पृथ्वी दूर पश्चिमेकडे उद्या परत येण्यासाठी निघालेल्या भास्कराला तिरप्या डोळ्यांनी बघते. साहजिकच, तो जेव्हा पृथ्वीला असं करताना बघतो तेव्हा त्याच्या मनात गुदगुल्या होतात व त्यावेळी त्याचे ते प्रखर तेज लोण्यासारखे वितळून जाते आणि मग त्याच्यामधून स्त्रवतो तो प्रेमाचा उबदार किरणवर्षाव!

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, ०५/०३/२०२४)



तुझे हसू कोणत्याही किमतीत घेऊन टाकीन मी. रक्ताचे पाणी, घामाच्या धारा काय फक्त बोलण्या-ऐकण्यासाठीच नसतात हे दाखवून देईन. तुझा तो हसरा चेहरा पाहिला की अगदी जग जिंकल्यासारखं वाटतं. नव्हे, जगात दुसरं कोणीच नाहीये फक्त तू आणि मी आहोत आणि मी तुला पाहतोय भान हरपून असं वाटतं. खरंच भान हरपून जातं. तुझ्याशिवाय बघण्यासारखं काय आहे नाहीतरी ह्या जगात? तुला सोडून दुसरं काय बघावं तर कशातच अर्थ वाटत नाही. तुलाही माझी ही व्याकूळता कधीतरी कळो असं आत, खूप आत वाटत राहत. 


- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)


कितीतरी प्रसंग रंगवले मी आपल्या भेटीचे. किती काय काय सांगून झालंय माझं तुला त्या सगळ्या वेळेला. पुन्हा तुला आठवले कि मागच्या वेळी काय बोलणं झालेलं ते टाळून नवीन काहीतरी तुला सांगायचा मी प्रयत्न करतो. नेहमीच असं होतं असंही नाही. कितीतरी वेळा मी आधी सांगितलेलं पुन्हा सांगत बसतो. पुन्हा ते उमजून मनात जरासा खट्टूही होतो. पण माझ्या त्या दिवास्वप्नांत तू मात्र मला इतकी समजून घेतेस कि माझा मला राग यायला लागतो, सतत वेंधळेणा करत राहिल्याबद्दल. आजही आता तुला आठवताना तू जवळ बसली आहेस आणि मी नुसता काहीबाही बडबडतो आहे असं वाटतंय. तू तेही शांतपणे ऐकून घेतीये असंही वाटतंय. कसं जमतं तुला माझ्या स्वप्नात येऊन इतकं शहाण्यासारखं वागायला? खऱ्या आयुष्यात कधी येशील आणि सांगशील का मला हे गुपित? मी वाट बघतोय आणि बघतच राहीन.

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)

Tuesday, April 22, 2025

धरती

उगता जीवन इस माटीसें

उगकर फलफूलता यहाँ 

कहते इस ग्रह को पृथ्वी 

रहते जीवजंतू सारे जहाँ


इस धरती पर हैं समंदर 

और पर्वत अतिविशाल

हरियाली तन पे छायी है  

सरपे पुरवाई का गुलाल


सात समंदर भूखंड सात

मानव भी अलग दिखते

कोई ऊँचा कोई नाटा

काले गोरे मिलकर रहते


कही वर्षावन, कही रेगिस्ता

कही लहलहाते खेतखलिहान

भरमार भौगोलिक स्थलोंकी

अपने जैसा दूजा न लेकिन


धरती का हैं हमसाया 

चंद्रमा रातके आकाशमें

और उजाला लेकर आता

सूरज, भर अपनी बाहोंमे


पृथ्वी अविरत चलती रहेगी

जब तक सूरज चांद रहेंगे 

मानव के संग नए जीव

धरा के आचलमें मिलेंगे


- मुग्धा संदीप चांदणे (मंगळवार, २२/०४/२०२५)

Sunday, April 20, 2025

प्रश्न अस्तित्वाचे

अथांग अफाट विश्वपसारा
त्यात यत्किंचित सूर्यमाला
आठ ग्रहांची जपमाळ ही
जाणे जपतो कोण कशाला

अवाढव्य आकार ग्रहांचे
परि जीवना थारा नाही
श्वासातून मनात रूजावा
असला तिथे वारा नाही

अबोध जीवा ओढ अनामिक
पृथ्वी नामक पाषाणाची
दीर्घिकेच्या कक्षेपल्याड
सर ना त्यास धूलिकणाची

मानव कधी पृथ्वीवर आला?
कशातून जन्म सूर्याचा झाला?
प्रश्नांतून नवे प्रश्न जन्मती
रोज मतिभंगुर प्रश्न उशाला

विज्ञानाची वीतभर दोरी
अध्यात्माचा कासरा हातभर
तरी न उमगले आजवर हे
जन्म मृत्यूचे गूढ अवडंबर

कितीक धर्म जगती आणि
प्रेषित पोथ्या घेऊन आले
काळाच्या महाकाळसर्पाने
सारे सहजी गिळून घेतले

काळ काळ हा असतो काय?
येतो कुठुनी जातो कोठे?
एक बाब आहे खचितच
काळाहून ना कोणी मोठे

निमित्त कसले? काय प्रयोजन?
भौतिकतेच्या भोवतालचे
मानवा छळतच राहतील हे
प्रश्न आपुल्या अस्तित्वाचे

- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, २१/०४/२०२५)

दिवाळी शुभेच्छा

खोल खोल राती
तेवता दिवा
झळाळे जरी
संदीप हवा

चैतन्य दारी
आणि रांगोळी
हसतयावी
अशी दिवाळी!


- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार १३/११/२०१५)

समर्पित भावसे झरना

कहीं दूर तुम जंगल में

रहते हो निबिड़ वनमें

एक बार जो दृक हुए

बस जाते हो फिर मनमें 


गाती बूँदे एक स्वर में

झरझर चोटीसे झरती 

और सुनाती हैं सृष्टीको

अपनी कलकल गिरती


ऊंचे पहाड़ोसे रिसते 

लाते जलवर्षा हो दूधी

रूप अपना बदलकर  

बन जाते हो एक नदी


झरने, हो महान गिरकर

तुम, हमको ये हैं सीखना

समर्पित भावसे अपनेको

निःसंकोच झोंक देना


- मुग्धा संदीप चांदणे (रविवार, २०/०४/२०२५)

पक्षीकुमार

भिन्नभिन्न रंगोसे मलकर
पर अपने लहराते हो
काया अतिसुंदर है तुम्हारी
पक्षीकुमार कहलाते हो

कैसे न हो कोई विमुग्ध
छवि जैसी तुम पाये हो
हर्षभरित हो जाते जन
जब, नृत्यमुद्रा बनाते हो

सावन का मौसम जब आता
खिल खिल यौवन आते हो
नभ-धरती के मधुर मिलनसे
खुद रोमांचित हो जाते हो

प्रियतम अपनी को देखकर
वहीं रूप तुम धरते हो
जिसे देखने मन मानवका
लालायित तुम करते हो

यूँ तो सृष्टीमें अनेक खग
पर, चित्रोंमे सजते हो तुम
कान्हाकेभी साथ युगोंसे
ओ, मयूर हो रहते तुम!

- मुग्धा संदीप चांदणे (रविवार, २०/०४/२०२५)




Saturday, April 19, 2025

नीले आसमाँ के नीचे

नीले आसमाँ के नीचे

मै खड़ी हूँ आँखे मीचे

यहाँ है फूलों से भरे

सात रंग के बगीचे  


तितली गाती धुन कोई

बुलाती मुझको हैं

मैं भी दौड़ जाती हूँ 

उसके पीछे पीछे


हवा के झोंके आतेजाते

सहलाते है पेड़ो को

सूरज की पड़ती किरणे

मनमें जाये उमंग सींचे


ऊँचे खड़े पहाड़ दिखते

दिखते उड़ते पंछी

दिन ये बड़ा सुहाना लगे

बाहोंमें मुझको भींचें 


- मुग्धा संदीप चांदणे (शनिवार, १९/०४/२०२५)

Tuesday, April 8, 2025

वारा आणि दिवा

वाऱ्याच्या झुळूकी रात्रभर
काहीतरी सांगून जात होत्या
दिव्यातल्या दिव्यात वाती
जोरात हेलकावे खात होत्या

विझायचं की तेवत रहायचं
दिव्यांचं नक्की ठरत नव्हतं
तेलातले जळते पाय काढून
त्यांना बाहेर जाता येत नव्हतं

कधी गार गार झुळूकी कधी
भिरभिरून येती पतंग वेडे
हात कुणा द्यावा दाह कुणा
भोळ्या दिव्यांना प्रश्न पडे

पतंगांच्या मनी असते काही
दिवे समजून घेत नाहीत
झूळूकींशी फेर धरून दिवे
जीवाची पर्वा करत नाहीत

पतंगांना जाळून मारण्यातच
दिव्यांची सगळी हयात सरते
वाऱ्याशी सलगीने तरी कुठे
त्यांचे आयुष्य वाढणार असते?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, ८/४/२०२५)

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...