सुनते थे हम, ये जिंदगीगम और खुशी का मेल हैहमको मगर आया नजरये जिंदगी वो खेल हैकोई सब जीते, सब कोई हार देअपनी तो हार है, यार मेरे, हां यार मेरे
मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
Monday, June 30, 2025
अपनी तो हार है
Sunday, June 29, 2025
निळासावळा रेशीम पक्षी
Monday, June 16, 2025
दोन नेते गुजराती
Tuesday, June 10, 2025
कोमलांगिनी चित्तहरिणी
कुठून हा येई समीर गंधीत तू नसताना
गंधातून दिसे साक्षात मज तू हसताना
काज कुठले कसे करू कळेना काही
हरवते माझे चित्त नित्य तुला स्मरताना
रोमांचित, अवचित तव दर्शने मी फार
मन्मनी घातला तव बाहूचा रेशीम हार
व्यर्थ घटिका नको आता हो जरा उदार
हे पळ पळ करती मनावर निर्दयी वार
पाहूनि तुज कोमलांगिनी चित्तहरिणी
शब्द हे आले नकळत मम अधरावरी
अंतिम बहुधा आज दिन हा या भूवरी
मना धीर धरी, करी अनुकंपा मजवरी
हे यौवन तव नवचैत्रासम साकार
घटासम वाढता दिसे कटी आकार
ते नयन नितळ गहिरे सरोवर फार
मी अति आतुर पोहून कराया पार
पुरे हे मौन मनोरथ माझे मनीचे जाण
ह्रदयी रुतला खोल तव प्रीतीचा बाण
करी त्वरा जरा करण्या अंत वेदनेचा
दुःखे त्यागीन विव्हळ व्याकूळ प्राण
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १०/०६/२०२५)
बहुतेक
रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये बहुतेक तो कढत होता शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता अंगाअंगी वळ उठले ब...
-
कहीं दूर तुम जंगल में रहते हो निबिड़ वनमें एक बार जो दृक हुए बस जाते हो फिर मनमें गाती बूँदे एक स्वर में झरझर चोटीसे झरती और सुनाती हैं सृष...
-
उन एक पायरी अजून उतरून खाली आलं आणि झाडाच्या पदराखालून हळूच डोकावून बघू लागलं. कोरड्या फटफ्टीत रस्त्यावरून वाळक्या पालापाचोळ्यांचा घोळका गलक...
-
भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...