Saturday, May 23, 2026

जुगार

बघा खोल खोल गेलं 
त्याच्या डोळ्यात आभाळ 
विचारात, काळजात 
माजलेलं रान काळं 

भारी लहरी ऋतूकाळ 
त्याला नाही समजत 
जीवा असे तहानभूक
त्याला नाही बसवत 

कसाबसा उचलीत
जाई तो पाय जड
सोन्याच्या उंबऱ्यात 
सांगे तो आपली नड 

जोमात जेव्हा फड
हिरवे शिवार डोलते 
बळीराजा सुखावतो 
यश जुगाराला येते 

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार २३/५/२०२६)

Friday, May 22, 2026

सावलीचा दवाखाना

काळवंडून गेला आहे
माझ्या सावलीचा चेहरा
काही कळेना!
बोलतही नाही आणि
पूर्वीसारखी हलतही नाही
पूर्वी पळायची भिंतीवरून
पायात घुटमळायची
मागे-मागे धावायची
झोपतानाही सरळ नाही....
कसले-कसले आकार काढायची
आताशा जणू झालीये, बधीर!
गोठून गेल्यासारखी
सदांन् कदा  पलंगाच्या कडेवरच
नाहीतर घालते येरझारा
खोलीतल्या खोलीत
मला तर काळजी वाटते...
आजारी-बिजारी पडली की काय?
दवाखान्यात न्यावं वाटतंय हिला
पण...
सावलीचा दवाखाना असेल?

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, ११/०८/२०१०)

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  पापण्या झुकल्या खाल...