Friday, April 3, 2026

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या.

निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं.

तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी न्हाय लपली, म्हातारीची नीट ऊठबस न्हाय केली, आसलं कायबी बागायतदार त्येला बोलणं लावी. म्हातारी तर त्येचा जीव घाईकुतीला आनी. सारक गुडघं चोळ, डोस्क दाब, खुब्याला त्याल लाव. म्हातारी जेवायबी उठू दीना गरीबाला.

मंग त्यो काम सोडून घरलाच गेला.

घरला लहान्या नाथ्यानं सारं आईकलं. तडक गेला बागायतदाराकडं काम मागाय.

बागायतदारानी आदुगर म्हातारीच्याच शेवेत लावला त्येला.

एक पारबी झाला नसल. नाथ्या बागायतदाराकडं आला. "ओ मालक, आईसायेब बोलाना झाल्याती. दुसरं कायतर काम सांगा." बागायतदार चमाकला. लगोलग उठून म्हातारीच्या छपरात गेला.

म्हातारी त्वांड वासून पडल्याली!

No comments:

Post a Comment

एकली नाव

एकली नाव दूर सागरी  परतीचा रस्ता  लाटांना विचारी  ऐकेना समुद्र  काही करून  वल्हे थकले  पाण्याशी भांडून  झुले भयाण  हिंदोळ्यावरी  एकली नाव  द...