Friday, April 3, 2026

आता बास!

मळलेल्या जिंदगीला
न्हाई ठावं न्हानं-धुनं
तिथं पाण्याला भेटाया
कवा जायाचं पांघरून

न्हाई वकुत कळंत
न्हाई वळंक लागत
मऊ गोदडीत माह्या
येऊन कुणीबी शिरतं

तिला कुठंबी टाकावं
कुणी तिच्यावं लोळावं
माह्या मऊ गोदडीनं
किती सोसावं सोसावं

केली व्हती तवा तिला
नव्या नवरीची शोभा
आता चिरगुटं करती
माह्या नावाने शिमगा

गोदडीची सर न्हाई
मऊसूत रजईला
अंग टाकीलं का कुठं?
इचारा पलंगावल्या गादीला

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)

No comments:

Post a Comment

एकली नाव

एकली नाव दूर सागरी  परतीचा रस्ता  लाटांना विचारी  ऐकेना समुद्र  काही करून  वल्हे थकले  पाण्याशी भांडून  झुले भयाण  हिंदोळ्यावरी  एकली नाव  द...