Wednesday, December 31, 2014

रूततेच आहे


गायलेस जेव्हा तू शब्दांना माझ्या

कविता माझी अजून...

गातेच आहे!

 

मोरपिशी स्पर्श तुझा, लाजाळू मनास माझ्या

मिटलेले अजून ते....

खुलतेच आहे!

 

वळलीस जेव्हा तू, माघारी पहाटेस

क्षितीजावर अजून ते....

उजाडतेच आहे!

 

गगनभरारी अशी, घेतली तुझ्यासवे

जमिनीवर पाउल अजून....

टेकतेच आहे!

 

पाउल उचलले तू रुतविण्या काळजात

खोल-खोल अजून ते....

रूततेच आहे!
- संदीप भानुदास चांदणे

माणूस

शिक्षक म्हणजे माणूस  पोलीस म्हणजे माणूस वकील म्हणजे माणूस  डॉक्टर म्हणजे माणूस इंजिनियर म्हणजे माणूस मालक म्हणजे माणूस कामगार म्हणजेही माणूस...