Tuesday, January 13, 2026

कारण तो पळ नवाच आहे

सांगीन तुजला पळात एका
नजरेतून मी बरेच काही
बोलायाचे होते आधीच
पण मी बोलू शकलो नाही

युगायु्गांचे नाते तरीही
मजला तो पळ हवाच आहे
तुझ्या अन माझ्या प्रीतीचा
कारण तो पळ नवाच आहे

कितीक दिन अन रात्री साऱ्या
मोजून मी त्या पळात ठेवीन
गुंफून त्या समयाची माला
तुझ्याच कंठी माळून जाईन 

सांगीन तुजला होते माझे
खरोखरीचे प्रेम तुझ्यावर
भरतील पाणी मजनू आणि
रोमिओ, खजील झाल्यावर

मरणाच्या हाताला धरूनी 
कायमचे मी जाण्याआधी
पळ तो जगता यावा म्हणूनि
तो पळ तू घेशील का हाती?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १३/१/२०२६)

No comments:

Post a Comment

कारण तो पळ नवाच आहे

सांगीन तुजला पळात एका नजरेतून मी बरेच काही बोलायाचे होते आधीच पण मी बोलू शकलो नाही युगायु्गांचे नाते तरीही मजला तो पळ हवाच आहे तुझ्या अन माझ...