लवलवती पापणी...
अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली
आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली
...लवलवती पापणी
थरथरती पापणी...
अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली
सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली
...थरथरती पापणी
झरझरती पापणी...
अविश्रांत असा, झरा वाहता झाली,
पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली
...झरझरती पापणी
- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, २५/०४/२०२५)
No comments:
Post a Comment