Saturday, June 3, 2017

प्रेमाचा खेळ

जीव जातो माझा इथे
तेव्हा तुझा खेळ होतो!
उशीराने येऊन लगेच
तुला कसा वेळ होतो?

रात्री झोप येत नाही
दिवसा काही होत नाही
घ्यावे करायला काही
सारा बट्ट्याबोळ होतो!

तू टोक दक्षिणेचे
उत्तरेचा ध्रुव मी
विचारतो वर त्याला
असा कसा मेळ होतो?

फुलापरी तू साजिरी
मी येडं पिकलेलं
तू आंबा करू पाहते
आणि मी केळं होतो!

प्रेम दोघांच्या मनात
पण धुंडाळ्याचा सोस
मनाचा ना ठाव लागे
इथे सारा घोळ होतो!

तुला वाटेलही कधी
शोधू दिवा हाती धरून
आता नाही पुन्हा कळेल
एकटा मी निर्भेळ होतो!

- संदीप चांदणे (३/६/२०१७)

No comments:

Post a Comment

सुखाची सुरेख सुटी!

पावसातल्या सुटीचा हाही एक असा दिवस, ज्या दिवशी पाऊस त्रासदायक वाटत नाही. पावसाळ्याच्या मध्यावर कदाचित त्याची सवय झालेली आहे आणि पाऊसही सुरुव...