Monday, May 18, 2020

त्रास

त्रास आहे नुसता
जगण्याचा...
आपल्याच जगण्याचा

हतबल होऊन
पाहण्याचा...
दु:खी कुणा पाहण्याचा

खिन्नता विषण्णता
वहाण्याचा...
नुसतीच वहाण्याचा

त्रास आहे नुसता
त्रासण्याचा...
सदानकदा त्रासण्याचा

- संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...