Sunday, May 17, 2020

सांजवेळ, वारा आणि गाणी

कितीतरी वेळा असं होतं.

सायंकाळचा वारा मोठमोठ्याने गाणं म्हणायला सांगतो. जसाजसा सूर्य डोंगराआड जाऊन प्रकाश कमी होतो आणि हवेतला गारवा गुलाबी होत जातो तेव्हा तोच वारा सावकाश पण आर्त असे काही गायला लावतो. अंधाराची मात्रा वाढते तसा किती नाही म्हटलं तरी उदासपणा दाटतोच. मग कुठलीशी सल अजून हळुवार गुणगुणायला लावते.

अशा वेळी जर जवळ मित्र असेल तर मैफल रंगते. दु:खाचीही गाणी होतात. कुणी जवळ नसल्यावर मात्र तो अंधार आणि ती रात्र खायला उठते.

- संदीप चांदणे (१०/०५/२०२०)

No comments:

Post a Comment

वारा आणि दिवा

वाऱ्याच्या झुळूकी रात्रभर काहीतरी सांगून जात होत्या दिव्यातल्या दिव्यात वाती जोरात हेलकावे खात होत्या विझायचं की तेवत रहायचं दिव्यांचं नक्की...