Friday, August 6, 2021

पेच

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

चंद्र-तारे फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनान सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
आणि एकांतान घेरावं
कितीही नको म्हटल तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रूसावं?
सुस्कारे नि हुंकार
याला गुणगुणनं कस म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

- संदीप चांदणे (१७/४/२०११)

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...