Monday, February 10, 2014

परतीचा प्रवास

(आग्ऱ्याहून परतीच्या वाटेवर एका हताश क्षणी शिवाजी महाराजांची देवाशी संवाद.)

आता नाही चालवत
आणि नाही सोसवत
एकेक गडी पडे, मनाला तडे
नाही देवा पाहवत

उघडयावर माझी प्रजा
उघडयावर त्यांचा राजा
कशी व्हावी भेट, कुठे दिसावी वाट,
कुठल्या कर्माची हि सजा

साद उध्वस्त मंदिरांची
हंबरत्या गायी-वासरांची
कानी ऎकू येते, कल्पनाही छळते
लुटत्या अब्रूच्या खेळांची

जीव ओवाळतो मातीवर
मराठी ह्या रक्तावर
दर्या आटवीन, नभही झुकवीन
सांगतो हे शपथेवर

वाकणार नाही कणा
हा मराठ्यांचा बाणा
आशीर्वाद मागतो, तू सारे जाणतो
आयुष्य वाहिले समरांगणा
 

No comments:

Post a Comment

पापणी

लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, ब...