Sunday, February 2, 2014

पर्वतारोहण

काळा कातळ सह्याद्रीचा
जबरी त्याची धार
शूर सहांनी हसूनी केला
सारा पर्वत पार!

वारा गर्जे कड्यामधुनी
वर गारठ्याचा मार
शूर सहांनी हसूनी सोसला
काळोखाचाही भार!

नसलेल्या वाटा तुडवून
सोडला पाउलखुणांचा सार
शूर सहांनी हसूनी कोरला
इतिहासात तो वार!

- संदीप चांदणे (1/2/2014)

No comments:

Post a Comment

बालुशाही आणि म्हैसूरपाक

कल्पना करा की तुम्हाला मिठाईच्या दुकानातून हवी तेवढी तुमची आवडती मिठाई घ्यायला सांगितली तर काय होईल? आता यात बरेच विभाग पडतील. जसे की पाकातल...