Wednesday, May 22, 2024

इच्छामटण

इच्छामटण

बोले भीष्म अर्जुनासी
शरपंजरी निजल्या निजल्या
पार्था, आण सत्वरें मटण
वाटीभर, शिजल्या शिजल्या

गरमागरम अळणी सूप
पितोच कसे फुर्रर करून
तर्रीदार मस्त रश्श्यात
भाकर खातो कुस्करून

ना कुठली आस ना ध्यास
तरी शरांचा टोच साही
मटण खाल्ल्याशिवाय मात्र
इच्छामरण मी घेणार नाही

कावराबावरा अर्जुन दावी
खिसा रिकामा प्यान्टीचा
वदे, भक्षितो भाजीपाला
कठीण काळ मासांताचा

कृष्ण धावला शिष्टाईस
करून तिरका डोळा
सांगे पाच पांडवांसी
करा लेको कॉन्ट्री गोळा!


संदीप चांदणे (१७/०१/२०१८)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...