Wednesday, May 22, 2024

रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ

कितने अजीब रिश्ते है यहां पे
दो पल मिलते है, साथ साथ चलते है
जब मोड आये तो बचके निकलते है

आणि…

मैने दिल से कहा ढूंढ लाना खुशी
नासमझ लाया गम, तो ये गम ही सही

ही उदासवाणी गाणी रोज संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान रेडिओवर पाठोपाठ लागायची आणि तो आनंदाने उसळायचा! दिवसभरातही लागायाची, तेव्हा लक्ष नसायचं पठ्ठ्याचं. साऱ्या ऑफिसने कामात वेग घेतलेला आणि हा डबा बॅगमध्ये ठेव, डेस्क आवर अशा कामात गुंतलेला.

आता इतक्या वर्षांनंतर रॉकींग, ढिंच्याक गाणी लागतात संध्याकाळी रेडिओवर. त्याला मात्र ऑफिसातच रेंगाळत बसावेसे वाटते.

ती गाणी आता रेडिओवर लागत नाहीत, त्याला कुठेतरी आत ऐकू येत असतात.


- संदीप चांदणे (बुधवार, ६/२/२०१९)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...