Saturday, November 6, 2021

नको आळ तुझ्या असण्यावर

गात राहिलो मी,
मुक्याने घाव सोसले नाही
जरि मैफिलीला माझ्या
कधी लोक पाहिले नाही

कधी आर्त, कधी कोमल
हळवे काही गुणगुणलो
हरेक जागेस दाद मिळता 
दर्दी जगण्याचा झालो

बांधून सुरात हुंदक्यांना
नेतो अस्फुट हसण्यावर
उद्या माझ्या नसण्याचा
नको आळ तुझ्या असण्यावर

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ५/११/२०२१)

No comments:

Post a Comment

जुगार

बघा खोल खोल गेलं  त्याच्या डोळ्यात आभाळ  विचारात, काळजात  माजलेलं रान काळं  भारी लहरी ऋतूकाळ  त्याला नाही समजत  जीवा असे तहानभूक त्याला नाही...