Thursday, January 5, 2023

हत्ती कितीही वाळला तरी

चारेक महिने चालून पळून
रात्रीचे रोज जेवण त्यागून
मैतर भोळा मला विचारी
सांग दिसतो बारीक? पाहून

प्रश्न विचारला अति झोकात
हसू ओठी, चमक डोळ्यात
हसून घ्यावे की खरे सांगावे
प्रश्न घिरट्या घाली डोक्यात

खूप विचारा अंती शांतपणे
मांडले माझे मौलिक म्हणणे
आतापर्यंतच्या गंभीर चर्चेत
सुरू फिदीफिदी झाले हसणे

टरबूज सुकले तरी त्याला
कुणी बोर म्हणत नाही
हत्ती कितीही वाळला तरी
त्याचं गाढव होत नाही

संदीप चांदणे (गुरूवार, ५/१/२०२३)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...