एकली नाव
दूर सागरी
परतीचा रस्ता
लाटांना विचारी
ऐकेना समुद्र
काही करून
वल्हे थकले
पाण्याशी भांडून
झुले भयाण
हिंदोळ्यावरी
एकली नाव
दूर सागरी
वर-खाली
लाटांचा खेळ
चालली घाईत
सांजेची वेळ
दिसेना किनारा
झाली बिचारी
एकली नाव
दूर सागरी
दिसला किनारा
पदर फडफडता
सूर्य रेंगाळला
शतदा विनवता
भरला श्वास
शिडांच्या उरी
एकल्या नावेने
दूर सागरी
- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, १३/०८/२०१३)
मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
Monday, September 28, 2026
एकली नाव
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकली नाव
एकली नाव दूर सागरी परतीचा रस्ता लाटांना विचारी ऐकेना समुद्र काही करून वल्हे थकले पाण्याशी भांडून झुले भयाण हिंदोळ्यावरी एकली नाव द...
-
आभाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वा...
-
कहीं दूर तुम जंगल में रहते हो निबिड़ वनमें एक बार जो दृक हुए बस जाते हो फिर मनमें गाती बूँदे एक स्वर में झरझर चोटीसे झरती और सुनाती हैं सृष...
-
भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...
No comments:
Post a Comment