Thursday, November 5, 2020

क्वारंटाईन

आलो तुझ्याचसाठी
सेव्हन सागरांवरून 
कंटाळून करून करून 
प्रेम सदा ऑनलाईन

कमवून आलो सखये
बंडल हिरवे डॉलरांचे
निवांत फिरूया दोघे
सारे स्पॉट टुरिस्टांचे

हॅप्पी वेडींग भारतात 
मालदीव्यात करू हनिमून 
पाहतो उघड्या डोळ्यांनी
ड्रीम फ्लाईटात बसून

हाय! पडला छाप हाती
विथ सरकारी डिझाईन
तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड
मी इकडे क्वारंटाईन!

- संदीप भानुदास चांदणे (०४/०४/२०२०)

No comments:

Post a Comment

एकली नाव

एकली नाव दूर सागरी  परतीचा रस्ता  लाटांना विचारी  ऐकेना समुद्र  काही करून  वल्हे थकले  पाण्याशी भांडून  झुले भयाण  हिंदोळ्यावरी  एकली नाव  द...