Tuesday, May 11, 2021

मखमली तम

मखमली तम सांडले
ओंजळीतून आभाळाने 
आणि शोभा आणली
अतिशीत चांदव्याने

छेडी राग प्रणयाचा
धीट चांदणी नभात
आळविते तेच पुन्हा
कापऱ्या मऊ स्वरात

रानामध्ये पानाआड
अवचितसा कोकिळ
धीट होऊनिया गातो
विरहगीत मंजूळ

वाटा रस्ते निपचित
कोणी बोलेनासे झाले
अंधाराच्या डोहामध्ये
एकेक घर बुडून गेले

- संदीप चांदणे (रविवार, ९ मार्च २०२१)

No comments:

Post a Comment

सरताज

खामोश तुम हो बेआवाज हूं मैं बेचैन बदहवास  परवाज हूं मैं तुम्हारे ही चर्चे  जमाने भर में हैं  हिजरत-ए-वफा  गमनवाज हूं मैं बेदखल आंखे बरसती रह...