चंद्र दिसला तोऱ्यात
जणू तीट अंधाराला
कुणी लावला नभात
गोलाकार अति काया
रूप चंदेरी साजिरे
साऱ्या तारामंडळाला
फिके फिके करणारे
नभी नवल पाहिले
खळखळून हसताना
त्याचे रात्रीचे आयुष्य
भरभरून जगताना
- संदीप चांदणे (शुक्रवार, १८/०३/२०२२)
मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
काळ्याकुट्ट अंधारात खोल पाण्याच्या डोहात कुठूनतरी अकस्मात बिया पडलेल्या सात बियांनी त्या सावकाश गाव तिथे वसवला लालचुटुक फुलांत सरोवर हरव...
No comments:
Post a Comment