Thursday, March 10, 2022

मनूचे श्लोक

मनू तू सदा हासतच रहावे|
रडू कसले ते कधी न पहावे||
आवडे तुला जे नित्यनेमी करावे|
नवनवे करोनि आम्हां दाखवावे||

सकाळी योगा करायचाय म्हणावे|
परि सकाळी न कधीही उठावे||
खाताना हे नको ते नको नसावे|
बकाबका तरीही कधी न चरावे||

कामात आपुल्या मग्न होऊनि जावे|
कुणासही तू न कधी दुखवावे||
बाबाला खात्री तुझ्या आहे यशाची|
तुझ्या पायाशी सुखाने लोळण घ्यावे||

- मनूचा बाबा

No comments:

Post a Comment

एकली नाव

एकली नाव दूर सागरी  परतीचा रस्ता  लाटांना विचारी  ऐकेना समुद्र  काही करून  वल्हे थकले  पाण्याशी भांडून  झुले भयाण  हिंदोळ्यावरी  एकली नाव  द...