Tuesday, April 12, 2022

भिंतीवरचा चिवट पिंपळ

भिंतीवरचा चिवट पिंपळ
मुळे रोवूनी खोल जातो
राबत्या वाहत्या जगाला
कोवळ्या पानांनी बघतो

पुढे फुटतो कोंब कोवळा  
मळकट मुळांची मागे नक्षी
कधी विसावा पाहून बसती 
हलके येऊन नवथर पक्षी

गावकुसाच्या राईमध्ये, आब
राखूनी पिंपळ असतो
भिंतीवरचा एकूट पिंपळ
कोण त्याची दखल घेतो?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १२/०४/२०२२)

No comments:

Post a Comment

कमळ

काळ्याकुट्ट अंधारात  खोल पाण्याच्या डोहात कुठूनतरी अकस्मात बिया पडलेल्या सात बियांनी त्या सावकाश  गाव तिथे वसवला  लालचुटुक फुलांत  सरोवर हरव...