Tuesday, December 20, 2022

घाटरस्ता निसर्ग आणि मी

नुकत्याच होऊन गेलेल्या
वर्षावाला, निथळून टाकणारी
हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई,
सकाळचे कोवळे ऊन पिऊन
तजेलदार झालेली नवी पालवी,
स्वच्छ धुऊन निघालेले,
लाल मातीच्या चिखलावर,
रेखीव छान वळणदार रांगोळीची
जणू निळीशार रेघच असलेले रस्ते,
त्यावरून वळणे घेत घेत मी
निवांतपणे,
आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत,
मजेत आवडीचे गाणे गुणगुणत,
घाटमाथ्यावर चढून जातो
आणि,
पुढे तसाच खाली उतरून जातो
दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.
परत येताना पुन्हा तेच सारं.

- संदीप चांदणे (सोमवार, १२/०९/२०२२)

No comments:

Post a Comment

खुदा ही बन जाते

एक खयाल यूं हैं, अगर बन पाते तो खुदा ही बन जाते काफीर हूं इसीलिए दुवामें हाथ नहीं उठाये जाते  - संदीप भानुदास चांदणे (गुरूवार , १७/१०/२०२४)