Sunday, January 28, 2024

लाजाळू नि गुलाब

लाजाळूच्या झाडापुढे
गुलाबाचं फूल नको
स्पर्शाविना मिटण्याची
त्याला नवी भूल नको!

गुलाबाच फूल भारी
लाजाळूला खेटलेलं
लाजाळूच झाड वेडं
येता जाता मिटलेलं!

कुणी द्या रे रंग-वास
लाजाळूला मिरवाया
तोरा दाखवून नवा
ताटव्याला फुलवाया!

- संदीप चांदणे (26/2/15)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...