Sunday, January 28, 2024

जगण्याचे मर्म

कळिकाळाच्या पडद्याआड
खेळ दुहेरी असा चालतो
कुणी मागती जन्म नव्याने
कुणी अनंतात मिसळतो

तिथेच असती काही भटके
स्फूर्तीच्या शोधात जरासे
अज्ञाताच्या गूढ रांगेतून
कायमचे होण्या नाहीसे

कुणा हवा भास जगताचा
छळतो कुणा त्रास जिवीताचा
युगे सरली तरी न उमगले
सोस असा का जाणिवांचा?

अविरत झटणारे नियंत्रक
तेही होती विचलित जेव्हा
चिरंजीव सिद्ध जीवात्मा
दावी जगण्याचे मर्म तेव्हा

महासागरात मिसळण्या
मासोळी नदीतून निघते
पाण्यावाचून नवे न काही
अंती तिथे तिला ते दिसते

व्याकूळ होऊन झटती जन
शोधण्या अर्थाचा सागर
जीवन केवळ पुढे सरकते
क्षणात घेऊन भरली घागर

- संदीप चांदणे (सोमवार २८/१२/२०२०)

No comments:

Post a Comment

धरती

उगता जीवन इस माटीसें उगकर फलफूलता यहाँ  कहते इस ग्रह को पृथ्वी  रहते जीवजंतू सारे जहाँ इस धरती पर हैं समंदर  और पर्वत अतिविशाल हरियाली तन पे...