Monday, October 7, 2024

सताड उघडे दार किरमीजी

सताड उघडे दार किरमीजी
पहाटेच्या भलत्या समयी
घडले काही विपरीत नक्की 
पाहून शंका मनात येई

दरोडा तर नसेल पडला 
का, अजून पडतोच आहे?
मनात येई, तडकाफडकी 
धीटपणाने पाहून यावे

पुन्हा वाटे मनास दुसऱ्या
लटके तिथे जाऊन पहावे 
चोर चोर हाका घुमाव्या 
नसते बालंट अंगी यावे

नाहीतर ब्याद भलती असावी 
कुणास ना सांगण्याजोगी  
बोलताच पसरेल असे की
लोण्याची माया विस्तवाअंगी 

जळोच ते दार किरमिजी
सताड जे उघडे आहे
कशास जाऊ त्या गावा
विनाकारण परीक्षा पाहे

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, १०/१०/२०२४)

No comments:

Post a Comment

ये रात आयेगी

ये रात आयेगी फुलो के साथ महकी हुई बहकी हुई सोचा न था ये रात आयेगी आई है जैसे मलमलके आंचलसे लिपटी बहारोसे खुशबू की महकी हवाये हो गाती हुई मिठ...