Friday, April 3, 2026

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या.

निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं.

तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी लपली न्हाय, म्हातारीची नीट ऊठबस केली न्हाय, आसलं कायबी बागायतदार त्येला बोलणं लावी. म्हातारी तर त्येचा जीव घाईकुतीला आनी. सारक गुडघं चोळ, डोस्क दाब, खुब्याला त्याल लाव. म्हातारी जेवायबी उठू दीना गरीबाला.

मंग त्यो काम सोडून घरला गेलाच.

घरला लहान्या नाथाने सारं आईकलं. तडक गेला बागायतदाराकडं काम मागाय.

बागायतदारानी आदुगर म्हातारीच्याच शेवेत लावला त्येला.

एक पारबी झाला नसल. नाथाजी बागायतदाराकडं आला. "मालक, आईसायेब बोलाना झाल्याती. दुसरं कायतर काम सांगा." बागायतदार चमाकला. लगोलग उठून म्हातारीच्या छपरात गेला.

म्हातारी त्वांड वासून पडल्याली!

बदहाल ओ बेचारा दिल

मलमलो-सुर्ख दामन शब-ए-हयात हमनींद होता है
बदहालो-बेचारा दिल बाद इसके कहीं रोता है

यूंही नही जहांमे तरन्नुम-ए-इश्क दोहराते परवाने
वो कौन है जो दिल में नगमा-ए-जफा लिए सोता है?

तबो-ताब गम-ए-सल्तनत की नसीब आती है
हां, यहीं हाल इक वफा-ए-पेशेदार का होता है

शायर कहलायेगा वो कारकून-ए-कचहरी जो
अपने खर्च-ए-एहसास से नगमे नही पिरोता है

चला चल आसमाँ की खाक-ए-इन्तेहा तक 'रोशन'
कहते है के कोई हबीब-ए-इनायत लिखा ही होता है

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, १४/१२/२०१८)

आता बास!

मळलेल्या जिंदगीला
न्हाई ठावं न्हानं-धुनं
तिथं पाण्याला भेटाया
कवा जायाचं पांघरून

न्हाई वकुत कळंत
न्हाई वळंक लागत
मऊ गोदडीत माह्या
येऊन कुणीबी शिरतं

तिला कुठंबी टाकावं
कुणी तिच्यावं लोळावं
माह्या मऊ गोदडीनं
किती सोसावं सोसावं

केली व्हती तवा तिला
नव्या नवरीची शोभा
आता चिरगुटं करती
माह्या नावाने शिमगा

गोदडीची सर न्हाई
मऊसूत रजईला
अंग टाकील का कुठं?
इचारा पलंगावल्या गादीला

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)

उभा मी वाटेवरती

तुझ्या डोळ्यांचे 
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती 

फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती

मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती

तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती

काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती

- संदीप चांदणे (शनिवार, १९/१२/२०२०)

ऐ इश्क बता

ऐ इश्क बता क्या मेरी हैं खता
क्यूं रूठा अब तक हैं हमसे?
जिस मोडपे तुझसे मिलना चाहे
वही होती मुलाकात है गमसे!

वो गुजरा जमाना आता याद
खोले दिल हम गाया करते
तारोंसे तब सीखा बाते करना
हाल उनका चंदासे पूछा करते
हम दिल को लिए फिरे हाथोंपर
लेकिन ना मिला दिलबर दिलसे!


गलियों कूचो में गूंजी थी
जो आहें भरी थी मनमे
कुछ तो आयेंभी छलकाते
मयके प्यालें रख आंखोंमे
हमनें तो बस जाना के वफा
हैं नाम इबादत का तुझसे!


अब कुछ भी कर जायें 'रोशन'
दिवानो मे गिने हम जायेंगे
दर्द की तर्जपें हमारे नगमें
दुनियावाले तडतपे पायेंगे
प्यासा दिल तो ये चाहे बस
बनके वो घटा हमपर बरसे!

ऐ एश्क बता क्या मेरी है खता
क्यूं रूठा अब तक हैं हमसे?
जिस मोडपे तुझसे मिलना चाहे
वही होती मुलाकात है गमसे!

- संदीप भानुदास चांदणे (रविवार, १५/११/२०२०)

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...