Thursday, July 2, 2026

बहुतेक

रात्रभर पडत होता
बहुतेक तो रडत होता

शेवटी उकिरड्यावर दिसला
बहुतेक तो सडत होता 

पापण्या झुकल्या खाली 
बहुतेक अवघडत होता 

अंगाअंगी वळ उठले 
बहुतेक तो घडत होता 

मंदिराबाहेर भिकारी वाढले 
बहुतेक तो मढत होता

आभाळी हात गेले 
बहुतेक धडपडत होता 

आयुष्याच्या कढईमध्ये 
बहुतेक तो कढत होता 

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, २/७/२०२६)


No comments:

Post a Comment

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  पापण्या झुकल्या खाली  बहुतेक अवघडत होता  अंगाअंगी वळ उठले  बह...