Thursday, July 10, 2014

हिरवा पाला

काळ्या काजळाचा रंग घनांवरी आला
काळ्या मातीचा धनी, मनी सुखावला!

लवे प्रकाशाची कांडी धुरकट लोळामध्ये
जो तो घरा-दारा निवाऱ्यात विसावला!

आले चैतन्य सृष्टीत, लगबग पाखरांची
कापसाची मऊ गादी सुगरणीच्या खोप्याला!

होईल रे दूर आता सारा पाचोळ्याचा भार
झाडाझाडांवर पुन्हा हिरवा दिसेल रे पाला!

- संदीप चांदणे (गुरूवार १०/७/२०१४)

No comments:

Post a Comment

जुगार

बघा खोल खोल गेलं  त्याच्या डोळ्यात आभाळ  विचारात, काळजात  माजलेलं रान काळं  भारी लहरी ऋतूकाळ  त्याला नाही समजत  जीवा असे तहानभूक त्याला नाही...