Thursday, July 2, 2026

बहुतेक

रात्रभर पडत होता
बहुतेक तो रडत होता

आयुष्याच्या कढईमध्ये 
बहुतेक तो कढत होता 

शेवटी उकिरड्यावर दिसला
बहुतेक तो सडत होता 

पापण्या झुकल्या खाली 
बहुतेक अवघडत होता 

अंगाअंगी वळ उठले 
बहुतेक तो घडत होता 

मंदिराबाहेर भिकारी वाढले 
बहुतेक तो मढत होता

आभाळात हात गेले 
बहुतेक धडपडत होता 

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, २/७/२०२६)

Thursday, June 11, 2026

माणूस

शिक्षक म्हणजे माणूस 
पोलीस म्हणजे माणूस
वकील म्हणजे माणूस 
डॉक्टर म्हणजे माणूस
इंजिनियर म्हणजे माणूस
मालक म्हणजे माणूस
कामगार म्हणजेही माणूसच
नेता म्हणजे माणूस
मंत्री म्हणजे माणूस 
सरकार म्हणजे अनेक माणसं 
देश म्हणजे अनेकाच्या पलीकडे असलेली माणसं


या सगळ्यात खोच अशी आहे 
एक माणूस दुसऱ्या माणसाच्या 
भल्यासाठी सांगा, खरंच झटणार आहे?

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, ११/६/२०२६)

Saturday, May 23, 2026

जुगार

बघा खोल खोल गेलं 
त्याच्या डोळ्यात आभाळ 
विचारात, काळजात 
माजलेलं रान काळं 

भारी लहरी ऋतूकाळ 
त्याला नाही समजत 
जीवा असे तहानभूक
त्याला नाही बसवत 

कसाबसा उचलीत
जाई तो पाय जड
सोन्याच्या उंबऱ्यात 
सांगे तो आपली नड 

जोमात जेव्हा फड
हिरवे शिवार डोलते 
बळीराजा सुखावतो 
यश जुगाराला येते 

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार २३/५/२०२६)

Friday, May 22, 2026

सावलीचा दवाखाना

काळवंडून गेला आहे
माझ्या सावलीचा चेहरा
काही कळेना!
बोलतही नाही आणि
पूर्वीसारखी हलतही नाही
पूर्वी पळायची भिंतीवरून
पायात घुटमळायची
मागे-मागे धावायची
झोपतानाही सरळ नाही....
कसले-कसले आकार काढायची
आताशा जणू झालीये, बधीर!
गोठून गेल्यासारखी
सदांन् कदा  पलंगाच्या कडेवरच
नाहीतर घालते येरझारा
खोलीतल्या खोलीत
मला तर काळजी वाटते...
आजारी-बिजारी पडली की काय?
दवाखान्यात न्यावं वाटतंय हिला
पण...
सावलीचा दवाखाना असेल?

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, ११/०८/२०१०)

Friday, April 3, 2026

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या.

निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं.

तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी न्हाय लपली, म्हातारीची नीट ऊठबस न्हाय केली, आसलं कायबी बागायतदार त्येला बोलणं लावी. म्हातारी तर त्येचा जीव घाईकुतीला आनी. सारक गुडघं चोळ, डोस्क दाब, खुब्याला त्याल लाव. म्हातारी जेवायबी उठू दीना गरीबाला.

मंग त्यो काम सोडून घरलाच गेला.

घरला लहान्या नाथ्यानं सारं आईकलं. तडक गेला बागायतदाराकडं काम मागाय.

बागायतदारानी आदुगर म्हातारीच्याच शेवेत लावला त्येला.

एक पारबी झाला नसल. नाथ्या बागायतदाराकडं आला. "ओ मालक, आईसायेब बोलाना झाल्याती. दुसरं कायतर काम सांगा." बागायतदार चमाकला. लगोलग उठून म्हातारीच्या छपरात गेला.

म्हातारी त्वांड वासून पडल्याली!

बदहाल ओ बेचारा दिल

मलमलो-सुर्ख दामन शब-ए-हयात हमनींद होता है
बदहालो-बेचारा दिल बाद इसके कहीं रोता है

यूंही नही जहांमे तरन्नुम-ए-इश्क दोहराते परवाने
वो कौन है जो दिल में नगमा-ए-जफा लिए सोता है?

तबो-ताब गम-ए-सल्तनत की नसीब आती है
हां, यहीं हाल इक वफा-ए-पेशेदार का होता है

शायर कहलायेगा वो कारकून-ए-कचहरी जो
अपने खर्च-ए-एहसास से नगमे नही पिरोता है

चला चल आसमाँ की खाक-ए-इन्तेहा तक 'रोशन'
कहते है के कोई हबीब-ए-इनायत लिखा ही होता है

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, १४/१२/२०१८)

आता बास!

मळलेल्या जिंदगीला
न्हाई ठावं न्हानं-धुनं
तिथं पाण्याला भेटाया
कवा जायाचं पांघरून

न्हाई वकुत कळंत
न्हाई वळंक लागत
मऊ गोदडीत माह्या
येऊन कुणीबी शिरतं

तिला कुठंबी टाकावं
कुणी तिच्यावं लोळावं
माह्या मऊ गोदडीनं
किती सोसावं सोसावं

केली व्हती तवा तिला
नव्या नवरीची शोभा
आता चिरगुटं करती
माह्या नावाने शिमगा

गोदडीची सर न्हाई
मऊसूत रजईला
अंग टाकीलं का कुठं?
इचारा पलंगावल्या गादीला

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, ३/४/२०२६)

उभा मी वाटेवरती

तुझ्या डोळ्यांचे 
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती 

फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती

मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती

तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती

काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती

- संदीप चांदणे (शनिवार, १९/१२/२०२०)

ऐ इश्क बता

ऐ इश्क बता क्या मेरी हैं खता
क्यूं रूठा अब तक हैं हमसे?
जिस मोडपे तुझसे मिलना चाहे
वही होती मुलाकात है गमसे!

वो गुजरा जमाना आता याद
खोले दिल हम गाया करते
तारोंसे तब सीखा बाते करना
हाल उनका चंदासे पूछा करते
हम दिल को लिए फिरे हाथोंपर
लेकिन ना मिला दिलबर दिलसे!


गलियों कूचो में गूंजी थी
जो आहें भरी थी मनमे
कुछ तो आयेंभी छलकाते
मयके प्यालें रख आंखोंमे
हमनें तो बस जाना के वफा
हैं नाम इबादत का तुझसे!


अब कुछ भी कर जायें 'रोशन'
दिवानो मे गिने हम जायेंगे
दर्द की तर्जपें हमारे नगमें
दुनियावाले तडतपे पायेंगे
प्यासा दिल तो ये चाहे बस
बनके वो घटा हमपर बरसे!

ऐ एश्क बता क्या मेरी है खता
क्यूं रूठा अब तक हैं हमसे?
जिस मोडपे तुझसे मिलना चाहे
वही होती मुलाकात है गमसे!

- संदीप भानुदास चांदणे (रविवार, १५/११/२०२०)

Saturday, February 28, 2026

कही दूर जब दिन ढल जाये

उन एक पायरी अजून उतरून खाली आलं आणि झाडाच्या पदराखालून हळूच डोकावून बघू लागलं. कोरड्या फटफ्टीत रस्त्यावरून वाळक्या पालापाचोळ्यांचा घोळका गलका करीत मावळतीकडून धावायला लागला. टेकलेल्या पाठीला आता जाग येत होती. डोळ्यांनी लगेच इकडेतिकडे पाहून वेळेचा अंदाज दिला. हाता पायांनी ताणून देत आळस झटकला आणि उठून बसल्याबरोबर ओठांनी आधी शीळ घातली अन मग गुणगुणायला घेतले सांजेच्या मनाला साद घालणारे आर्त गाणे, "कही दूर जब दिन ढल जाये..."

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, २८/२/२०२५)

Friday, February 13, 2026

सरताज

खामोश तुम हो
बेआवाज हूं मैं
बेचैन बदहवास 
परवाज हूं मैं

तुम्हारे ही चर्चे 
जमाने भर में हैं 
हिजरत-ए-वफा 
गमनवाज हूं मैं

बेदखल आंखे
बरसती रही 
फिरभी नाकारा 
बेअंदाज हूं मैं 

यूं तो हुए हैं 
दिवाने कई
सर-ए-आशिक
सरताज हूं मैं 

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, १३/२/२०२६)

Thursday, February 12, 2026

दुनिया

हैं दुनिया कहते जो हैं इसका नाम
नहीं मुझे उस जगह से कोई काम 
हैं दुनिया जहाँ पर हैं इन्सान रहते 
इन्सानियत हैं लेकिन जहाँ बदनाम

ये दुनिया बनी दुनियावालो के दम पर
हैं दुनिया यही जो थी बरसो यही पर
ये दुनिया वाले मगर आते जाते रहेंगे
दुनिया जैसी की तैसी रहेगी यही पर

समझते हैं जो देखी दुनिया हैं हमने
गली गली उन्हे भटकते देखा हैं हमने 
जो नाजो से परदेस जाके भी आये
उन्हे दुनिया से मुंह मोडते देखा हैं हमने

हैं दुनिया ये जैसी नहीं भाती किसीको
हैं अपनी पसंद अलग दुनिया सभीको
आये तो हैं अब ये समझना पडेगा 
हैं दुनिया मगर जिसमें जीना हैं सभीको 

- संदीप भानुदास चांदणे (गुरुवार, १२/२/२०२६)


Tuesday, January 13, 2026

कारण तो पळ नवाच आहे

सांगीन तुजला पळात एका
नजरेतून मी बरेच काही
बोलायाचे होते आधीच
पण मी बोलू शकलो नाही

युगायु्गांचे नाते तरीही
मजला तो पळ हवाच आहे
तुझ्या अन माझ्या प्रीतीचा
कारण तो पळ नवाच आहे

कितीक दिन अन रात्री साऱ्या
मोजून मी त्या पळात ठेवीन
गुंफून त्या समयाची माला
तुझ्याच कंठी माळून जाईन 

सांगीन तुजला होते माझे
खरोखरीचे प्रेम तुझ्यावर
भरतील पाणी मजनू आणि
रोमिओ, खजील झाल्यावर

मरणाच्या हाताला धरूनी 
कायमचे मी जाण्याआधी
पळ तो जगता यावा म्हणूनि
तो पळ तू घेशील का हाती?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १३/१/२०२६)

Tuesday, January 6, 2026

देहाची तिजोरी - विडंबन

नेहा तर कमजोरी 
भक्तीचाही हात हवा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

जातो नीट डोळे मिटूनी
खात शेण-माती
मनी भामट्याच्या का रे
भीती त्या भावांची?
झाकलेल्या पाठीवरती 
वळ का उठावा?
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

उजेडात होती आई अंधारात बाप
बाप नव्हे तो तर आहे काळा काळा साप
दुष्ट दुश्मनांच्या गल्लीत
एकटा मी भावा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?


पार्थ आहे मित्र माझा हा मुजोरी
नको नको म्हटले मी शीळ देतो तरी 
घडोघडी चुकांना त्या 
किती पांघरावा?
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

तुझ्या हातीच रे गार्डा बिंग ना फुटावे
कुणी पाहण्याच्या आधी तिथून मी सुटावे
रस्ता घरी परतण्याचा
लगेच सापडावा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

कॉलेजात होतो म्हणून हा असा स्टंट झाला 
आता मात्र लग्नासाठी स्वतःला मुक्त केला
भक्ती आणि आरतीही
करतील माझा हेवा!
त्यांना कळेल देवा आता
त्यांना कळेल देवा

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, ६/१/२०२६)

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  पापण्या झुकल्या खाल...