Monday, August 16, 2021

कळेना मला

कळेना मला

मनात मोर कसे नाचतात
हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर...
...मला कळालं!

जीभ कशी अडखळते
हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना...
...मला कळालं!

ह्रद्य कसे धडधडते
हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना...
...मला कळालं!

पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही
तुझा निरोप घेताना, दरवेळी
डोळ्यातलं पाणी कस अडवावं
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!

- संदीप चांदणे

Friday, August 6, 2021

पेच

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

चंद्र-तारे फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनान सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
आणि एकांतान घेरावं
कितीही नको म्हटल तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रूसावं?
सुस्कारे नि हुंकार
याला गुणगुणनं कस म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

- संदीप चांदणे (१७/४/२०११)

Monday, August 2, 2021

घर

घर म्हणजे नाही
विटा मातीचा ढिगारा
नाही घामाच्या पैशांचा
विनाकारण चुराडा

घर असावे सुंदर
जसा खोपा पाखराचा 
जेव्हा येई अंधारून
करी पुकारा मायेचा

सडा घातल्या अंगणी
झाड निंबोणीचे पुढे
परसदारात, मोगरा
जाई-जुईची फुलझाडे

असो वाडा चिरेबंदी
वा खोपटे गरीबाचे
घर म्हणावे त्याला
जिथे खेळ लेकरांचे

घर ओळखे चाहूल
जिवाभावाच्या पायांची
दारातून येई हाक
चहाच्या आवतानाची

घर जितके लहान 
थोर आपुलकी त्याची 
वाडया महालांमधून
चाले मिजास वाऱ्याची

- संदीप चांदणे (सोमवार,  ०२/०८/२०२१)

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...