विटा मातीचा ढिगारा
नाही घामाच्या पैशांचा
विनाकारण चुराडा
घर असावे सुंदर
जसा खोपा पाखराचा
जेव्हा येई अंधारून
करी पुकारा मायेचा
सडा घातल्या अंगणी
झाड निंबोणीचे पुढे
परसदारात, मोगरा
जाई-जुईची फुलझाडे
असो वाडा चिरेबंदी
वा खोपटे गरीबाचे
घर म्हणावे त्याला
जिथे खेळ लेकरांचे
घर ओळखे चाहूल
जिवाभावाच्या पायांची
दारातून येई हाक
चहाच्या आवतानाची
घर जितके लहान
थोर आपुलकी त्याची
वाडया महालांमधून
चाले मिजास वाऱ्याची
- संदीप चांदणे (सोमवार, ०२/०८/२०२१)
No comments:
Post a Comment