मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
Thursday, January 5, 2023
हत्ती कितीही वाळला तरी
चारेक महिने चालून पळून
रात्रीचे रोज जेवण त्यागून
मैतर भोळा मला विचारी
सांग दिसतो बारीक? पाहून
प्रश्न विचारला अति झोकात
हसू ओठी, चमक डोळ्यात
हसून घ्यावे की खरे सांगावे
प्रश्न घिरट्या घाली डोक्यात
खूप विचारा अंती शांतपणे
मांडले माझे मौलिक म्हणणे
आतापर्यंतच्या गंभीर चर्चेत
सुरू फिदीफिदी झाले हसणे
टरबूज सुकले तरी त्याला
कुणी बोर म्हणत नाही
हत्ती कितीही वाळला तरी
त्याचं गाढव होत नाही
संदीप चांदणे (गुरूवार, ५/१/२०२३)
Subscribe to:
Posts (Atom)
रोशनदान
कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...
-
उकरून-टोकरून काढली बघ कुणी पुन्हा प्रेमाची पुरलेली आठवण जी नीट पुरलीच गेली नव्हती अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यातून सतत उघडी पडत होती तो काळ...
-
"नसतेस घरी तू जेव्हा" ह्या कवितेवरील हे विडंबन मराठीतील सुप्रसिद्ध कवी श्री संदीप खरे यांची माफी मागून रसिकांना अर्पण! येतेस...
-
दिवाळी बोनस मिटींग! ढीस्क्लेमर : सदर कथेतील पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत तरी याचा कुठल्याही व्यक्तींशी संबध येऊ शकतो. तसा आल्यास व तो आल...