(८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्यकट्टा या काव्यमंचावर १७/१/२०१६ रोजी सादर केलेली कविता)
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?
दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?
ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
- संदीप चांदणे (२५/८/२०१५)
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?
दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?
ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
- संदीप चांदणे (२५/८/२०१५)
bhannat aahe kavita... khupacha chan..
ReplyDeleteधन्यवाद!
Delete