भिंतीवरचा चिवट पिंपळ
मुळे रोवूनी खोल जातो
राबत्या वाहत्या जगाला
कोवळ्या पानांनी बघतो
पुढे फुटतो कोंब कोवळा
मळकट मुळांची मागे नक्षी
कधी विसावा पाहून बसती
हलके येऊन नवथर पक्षी
गावकुसाच्या राईमध्ये, आब
राखूनी पिंपळ असतो
भिंतीवरचा एकूट पिंपळ
कोण त्याची दखल घेतो?
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १२/०४/२०२२)