काय भुर्र्कन गेले ते दिवस! शाळेचे! कळालसुद्धा नाही!
कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढ-या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वा-यावर भिरकवून द्याव तस भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येत. परत मिळवता येत नाही, इतकच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचच!
आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायच, कोण कस शिकवायच हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!
एक मात्र नक्की, भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारख दुसर काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र! काही जुनेच काही मागून आलेले. काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे वाटते. यासारखा विरंगुळाही नसावा!
शाळेतली पूजा, शाळेचं स्नेहसम्मेलन, शाळेत करून मागितलेले तक्ते! शाळेत वर्ग सजवताना पताक्यांसोबत घातलेला धिंगाणा! सर्वांच्यासोबत खाल्लेला मार! शाळेची सहल! टिंगल टवाळी, अखंड बडबड, मॉनिटरने वहीत नावं लिहूण घेणे मग ती सरांपर्यंत पोचू नये म्हणून धडपडलेलो आपण! कधीतरी वर्गातल्या एखाद्या मुलीने मारलेली हाक सुखद धक्का देऊन गेलेली! अरे, हिला आपलं नाव माहितीये! तीच गोड शिरशिरी आताही नकळत अंगातून उठतेच!
जीवावर आलेल्या त्या घटक चाचण्या, सहामाह्या आणि त्याहून मनाला टोचणारे ते वर्गात पेपर देऊन सरांचे मार्क सांगण्याचे प्रसंग. कधी शाळेत आलेले जादूचे प्रयोग, कागदाची ओरिगामी शिकवणारे कलाकार. त्याची पुस्तके घेऊन शिकण्याचा प्रयत्न करताना फसल्याची जाणीव होणारे आपण. नळावर पाणी प्यायला जणू गोठ्यातून सोडून दिलेली तहानलेली वासर गायांची कास लुचायला धावतात तसे धावणारे आपण. काय सुंदर दिसत हे आता आठवणींतून! धावत्या चित्रांचा पटच जणू कुणी समोर धरून दाखवित आहे!
अजून एक विशेष सांगायच म्हणजे नोकरी धंद्यात जवळपास प्रत्येक आजूबाजूवाल्यांशी स्पर्धा करणारे आपण, वर्गमित्रांसोबत अगदी बरोबरीचे होऊन जातो. त्यांच्यात कधीच कोणी मोठा आणि लहान नसतो. हे मित्र कधी भेटले की सख्खे नातलग भेटल्याचा आनंद होतो. कधी एकमेकांची प्रशंसा करताना शब्द कमी पडू लागतात त्याचवेळी एकमेकांची गमतीने उणीदुणी काढताना कसली भीडही ठेवली जात नाही. हे फक्त शाळेतल्या मित्रांसोबत सहजशक्य असतं!
प्रचंड प्रमाणात (पक्षी: पाण्यासारखे!) सोमवार ते शनिवार, आयुष्यातले, शाळेतल्या मित्रांसोबत खर्च केलेले असतात. कधी काही खास रविवारसुद्धा! तेव्हा कळतच नसतं हे क्षण किती खास आहेत आणि आठवणी होऊन पुढे आयुष्यभर आनंद देणार आहेत. तेव्हा घड्याळाच्या अन कॅलेडराच्या मदतीने नियती भराभर आपले वय वाढवित असते. आणि आपण जणू प्रवाहाच्या मधल्या धारेत जखडून जाऊन एका ठराविक गतीत वाहत असतो.
काय एकेक आठवणी
काढाव्या तेवढ्या कमीच!
खोल पहात बसण आणि
खुदकन हसणही उगीच!
रोज त्याच चालीवर शिकवणारे
दोन-चार शिक्षक आठवतात
वर्गातल्यांची नावे आठवताना
एकेक चेहरे डोळ्यांपुढून सरकतात!
पहिल्या दिवसाची प्रार्थनेची रांग अन्
दिवस पहिला बेंचवरचा आठवतो
वर्गशिक्षकांची हजेरी आणि मागचा
फळ्यावरचा सुविचार आताही वाचता येतो!
मोठेपणीच्या या लंचटाईमला
मधल्या सुट्टीतली भूक लागत नाही
डबे काढून बसा एकत्र सगळे
अस सांगणारी घंटा आता वाजत नाही!
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटत, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?
- संदीप चांदणे (२१/१०/१५)

No comments:
Post a Comment