Thursday, June 22, 2023

जुन्या जखमांवरच्या नव्या खपल्या

आठवांच्या नखांनी
टोकरल्या, उकलल्या
जुन्या जखमांवरच्या
नव्या निबर खपल्या

सूर बासरीचे नको
ना हातात टिपरी
कुठे राहीलीत गाणी
ओठांवर आपुल्या?

एकट्याला सोडूनही
तू एकटे सोडत नाही
मिटल्या डोळ्यांतही
तुझ्या आहेत सावल्या

नकळत कधी तुझे
नाव ओठांवर येते
निष्ठूर नियती लगेच
दाखवते वाकुल्या

- संदीप भानुदास चांदणे (शनिवार २४/०६/२०२३)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...