Tuesday, July 15, 2025

सहा कोवळे पाय

नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर

एकामागे दुजा चाले पुढचे पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना

कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशां शोधतो

मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा

क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...