Tuesday, January 13, 2026

कारण तो पळ नवाच आहे

सांगीन तुजला पळात एका
नजरेतून मी बरेच काही
बोलायाचे होते आधीच
पण मी बोलू शकलो नाही

युगायु्गांचे नाते तरीही
मजला तो पळ हवाच आहे
तुझ्या अन माझ्या प्रीतीचा
कारण तो पळ नवाच आहे

कितीक दिन अन रात्री साऱ्या
मोजून मी त्या पळात ठेवीन
गुंफून त्या समयाची माला
तुझ्याच कंठी माळून जाईन 

सांगीन तुजला होते माझे
खरोखरीचे प्रेम तुझ्यावर
भरतील पाणी मजनू आणि
रोमिओ, खजील झाल्यावर

मरणाच्या हाताला धरूनी 
कायमचे मी जाण्याआधी
पळ तो जगता यावा म्हणूनि
तो पळ तू घेशील का हाती?

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १३/१/२०२६)

Tuesday, January 6, 2026

देहाची तिजोरी - विडंबन

नेहा तर कमजोरी 
भक्ती आरतीचा हेवा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

जातो नीट डोळे मिटूनी
खात शेण-माती
मनी भामट्याच्या का रे
भीती त्या भावांची?
झाकलेल्या पाठीवरती 
वळ का उठावा?
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

उजेडात होती आई अंधारात बाप
बाप नव्हे तो तर आहे काळा काळा साप
दुष्ट दुश्मनांच्या गल्लीत
एकटा मी भावा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?


पार्थ आहे मित्र माझा हा मुजोरी
नको नको म्हटले मी शीळ देतो तरी 
घडोघडी चुकांना त्या 
किती पांघरावा?
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

तुझ्या हातीच रे गार्डा बिंग ना फुटावे
कुणी पाहण्याच्या आधी मी तिथून फुटावे
रस्ता घरी परतण्याचा
लगेच सापडावा
कुठून झाली बुद्धी देवा?
कुठून झाली देवा?

कॉलेजात होतो म्हणून मी असा स्टंट केला
आता मात्र लग्नासाठी स्वतःला मुक्त केला
भक्ती, नेहा अन आरती
करतील माझा हेवा!
त्यांना कळेल देवा आता
त्यांना कळेल देवा

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, ६/१/२०२६)

सरताज

खामोश तुम हो बेआवाज हूं मैं बेचैन बदहवास  परवाज हूं मैं तुम्हारे ही चर्चे  जमाने भर में हैं  हिजरत-ए-वफा  गमनवाज हूं मैं बेदखल आंखे बरसती रह...