Thursday, August 14, 2014

बाला - 2

गुलाबी थंडीच्या
मऊशा उन्हात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?

कवळून आळस
गाठला कळस
चालली नाजूका
सावलीच्या मायेत
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?

जगाचा विसर
चालही सरसर
कुठल्या तालात
कुणाला माहीत!
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?

पायघोळ झगा
दावितो फुगा
भासे चित्र
ते जलरंगात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत?


- संदीप चांदणे (14/8/14)

Monday, August 11, 2014

ते तेरा

तेराही ते भक्तीत नहाले
शिवशंभोच्या शरणी गेले
कपाळी त्रिशूळाचा टिळा
मुखी बम बम भोले!

तेराही ते जरा न भ्याले
मस्त झाले, रिचवून प्याले
सरसर चढूनी त्या चढणीवर
'नागफणी' ती तुडवून आले!

तेराही ते हरखून गेले
निसर्गापुढे नत झाले
सह्याद्रीला भरून श्वासात
घाटमाथ्यावर धुंद नाचले!

- संदीप चांदणे (11/8/14)

Tuesday, August 5, 2014

विरह

नाजूक हास-या कळ्या, हरवले चांदणे माझे
बुडून बसले काळोखात विरहाचे क्षण माझे

स्वप्नांचाही गुंफता येईना, गोफ, डोळे मिटून
विचारात जागते माझी, रात्र, कूस बदलून

उधळीन तुझ्या वाटेवर, जे तुला हवे
येशील का सांग, तू श्रावण सरींसवे?

- संदीप चांदणे (5/8/2014)

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...