Monday, October 13, 2014

अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे. आणि बादशहा अकबर तिच्या कक्षाकडे चालत येत आहे.]
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ : बेगमचा शयनकक्ष
काळ : निवांत बसून गप्पागोष्टी करण्याचा
वेळ : सायंकाळची
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पात्रे :
1) अकबर
2) बेगम
3) बिरबल
4) बेगमचा भाऊ म्हणजेच अकबराचा मेहुणा
5) शिपाई नं. 1
6) शिपाई नं. 2
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(अकबर बेगमच्या शयनकक्षासमोर येतो व पाहतो तर आपण आल्याची वर्दी द्यायची सोडून दोन शिपाई व्हाटसअपवरचे जोक वाचून हसत आहेत. अकबर त्यांच्यामागे उभा राहिला तरी त्यांना पत्ता नाही.)
अकबर : (जोराने ओरडून) नालायकांनो, चिरा पडली तुमच्या तोंडान, हे काय करताव? (दोघेही शिपाई दचकतात व अकबराला पाहून खूप घाबरतात)
शिपाई नं. 1 : (वेडगळपणाने) बादशहानु, आम्ही जोक वाचताव. तुम्हाना सांगतो अस्ला जबरी हाये... (दुसरा शिपाई पहिल्याला चिमटा काढून त्याला शांत बसायची खूण करतो)
शिपाई नं. 2 : (चाचरत) बादशहानु जल्ला तुम्ही आलाव?? जल्ला मंग त्या मांगच्या शिपुरड्यानी वर्दी दिल्याली मना ऐकू कशी नाय आली??
अकबर : (वैतागून) आर त्योबी जल्ला फेसबुकावर कुण्या पोरीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्याली समद्यांना दाखवत बसलाय. आरे तुम्हाना काय लाज लज्जा शरम?
शिपाई नं. 1 : आमचा दादूस बोल्ला कोण्च्या बी कामाची लाज धराची नाय...(पुन्हा एक चिमटा काढून दुसरा शिपाई त्याला थांबवतो)
शिपाई नं 2 : बादशहानु, म्या तरी ह्याला सांगत व्हतो, कॅन्डी क्रश लाव. एक डाव मांजा, एक डाव तुजा आस खेळू पण यानीच व्हाटसअप लावून मना जोक वाचाया लावलान. मंग मी हसणारच ना तुम्हीच सांगा तुम्हीबी हसला अस्ताव का नाय जोक आयकल्यावर?
अकबर : (वैतागून) ए अरे ए...पण हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव??
शिपाई नं. 1 : (पुन्हा वेडगळपणाने) ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो)
अकबर : (वैताग, राग, चिडचिड एकदमच आणत) आरे कसा करता म्हंजे करून दाखवतय रे मेल्या. बंद करा ते आन काम करा कामाच्या येळेला! (दोघेही शिपाई खाली मान आणि खांदे टाकून उदास चेह-याने आपापल्या जागेवर म्हणजेच दरवाज्याच्या दोनही बाजूला उभे राहतात आणि वर्दी द्यायला सुरू करतात.)
शिपाई नं. 1 : बाहिथ बघ
शिपाई नं 2: बा खाली जा
शिपाई नं 1 : हुश्शार!
दोघेही शिपाई : बादशा अकबर येत्यात हो ~~ (अकबर आत शिरतो)
बेगम : (वैताग चेह-यावर स्पष्ट आणित) ह्यो कंचा टायम म्हणायचा? हिथ सफरचंद चिरून चिरून आवरे बारीक झाले की आता फोडणीलाच टाकणार व्हते.
अकबर : (रोमॅन्टिक आवाजात) अग आवरे... तुज्या हातच कारल बी मना गोरच लागतय, मंग जल्ला ह्ये तर सफरचंद हाय ना?
बेगम : (लाजत) जावा तिकरं!
अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का?
बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून...आता मी काय सांगते जरा कान देऊन ऐका. (अकबर सावरून बसतो) मांजा भाव, दोन - चार जांगेवर हिन्टरव्ह्यू देऊन आलाय पण त्येला जॉब मिळालेला न्हाय. आन त्यो तर लईच हुश्शार हाये तवा त्येला तुम्ही तुमच्याकडच ठिऊन घेवा.
अकबर : आवरे, जल्ला त्यो जर आवराच हुश्शार हाये तर त्येला त्या दोन - चार जागेवाल्यांनीच का न्हाय घितला?
बेगम : (चिडून) जल्ला मांज्या माहेरच्या लोकांचा काय बी तुम्हांना बघवतच नाय. मी जातेच आता माहेराला. मंग बसा एकटेच सफरचंद खात! (सफरचंदाच ताट आदळते)
अकबर : (विनवणीच्या सुरात) आग आवरे, तसा नाय, त्येला चांगला जॉब लागूदे. मी कुठ काय म्हणतोय.
बेगम : हां, मंग त्येला तुम्हीच जॉब देवा!
अकबर : अग पण आवरे त्येला तर ऑटोकॅड पण तर नाय येत. मंग त्येला कोण्च काम देऊ मांज्या हापिसात?
बेगम : (उपरोधाने) तुमच्या बिरबलाची तर लय मोठी डिग्री हाये ना. मंग सगळे लोक कामावरन कारा आणि एकट्या बिरबलालाच ठीवा की कामासाठी.
अकबर : (पुन्हा अजिजिने) अग आवरे चिरू नको, तू म्हणतेस तर त्येला ठिऊन घेतो कामाला. पण काय कामासाठी घिऊ, मना कलत नाय.
बेगम : त्येला बिरबलाच्या जागेवर डिटेलर म्हणून घ्या.
अकबर : आग आवरे! बिरबल तर आमचा ब्येस डिटेलर हाय. त्येच्या बराबरीत तुजा भाव कुठच नाय. मंग बिरबलाला कारायचा कसा?
बेगम : तुम्ही मांज्या भावाला वलकत नाय! त्येच्या हुशारीची कहाणी आमच्या गावात समद्यांना तोंडपाठ हाये. आणि आता जर तुम्ही त्येला कामावर नाय घेताव तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा.
अकबर : आवरे, हे बघ, तुना कुठबी जायाची गरज नाय. आपण आताच हिथ तुज्या भावाला आन बिरबलाला बोलवून घिऊ आणि त्यांची टेस्ट घिऊ. तुज्या समोरच निकाल लागूदे दोघांचा.
बेगम : ठीक हाय!
अकबर : (टाळी वाजवतो) जल्ला कोण हाये का तिकरं? (शिपाई नं. 1 हातात मोबाईल धरून काहीतरी टाईप करीत आतमध्ये येतो.) आरे ये कालतोंड्या, मोबाईलसकट फिकून दीन आठव्या मजल्यावरन. जवा बघाव तवा मोंबाईल-मोंबाईल. आवरा काय अस्तय रे त्याच्यात?
शिपाई नं. 1 :(मोबाईल पुढे करीत) रिचार्ज वर ऑफर हाये. रिचार्जवर एक पिझ्झा फ्री!
अकबर : बाबो, पिझ्झा! मंग माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर!
शिपाई नं. 1 : बादशहानु छोटा रिचार्ज आता पन्नासचा झालाय, तुम्हांना परवरतय का सांगा? लगीच करतो. पण अर्धा पिझ्झा मना बी पायजे.
बेगम : (वैतागून जोरात ओरडते) आरे गप बसा तुम्ही दोघबी. मांज्या डोक्यांचा पिझ्झा होतय.
अकबर : अरे शिपाई, जा आमच्या मेवण्याला जिथ आसल तिथ जाऊन सांग, तूना बोलावलंय हाय म्हणाव बादशहानं!
(शिपाई जातो आणि बादशहाचा मेहुणा वेडे चाळे करत आत येतो.)
मेहुणा : बादशाहाचा ईजय  चव्हाण असो! (दात विचकत फिदीफिदी हसतो)
अकबर : वा! आवरे ह्यो तर खरंच लई हुश्शार हाये!
बेगम : असू दे! ईचारा काय इचारायचंय ते!
अकबर : (हातातला एक पेपरचा गठ्ठा मेहुण्यासमोर टाकत) हे काय हाये सांगतोस का?
मेहुणा : ह्यो कागदाचा गठ्ठा आहे. (स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन दात काढतो. बेगम पण त्याच्या डोक्यावरून गहिवरून हात फिरवून बोटे मोडते)
अकबर : (आता वैतागून दुसरीकडे पाहत) ह्येच्यावर काय दिसतंय तूना?
मेहुणा : (खूप निरखून पाहिल्याचा आव आणीत) जापन्ना ह्येच्यावर मना लय काल्या काल्या लायनी दिसत्यात आन एक गारीबी दिसते. पोंम पोंम! (पुन्हा दात विचकतो)
अकबर : (मनात आधी 'बास' म्हणतो) शाबास! आता मना सांग ह्ये गारीच्या बाजूला घर हाये ते कराया तूना कितके दीस लागतीन?
मेहुणा : (छाती फुगवून) लय दीस लागतीन!
अकबर : बेगम, आता मी बिरबलाला बोलवतो! (ताली वाजवत) ये व्हाटसअप वाल्या हिकर ये! (शिपाई आत आल्यावर) जा बिरबलाला सांग आम्ही बोलावलंय!
(शिपाई जातो आणि बिरबल बादशहा आणि बेगम यांना मुजरा करत आत येतो.)
बिरबल : बादशहा सलामत आन बेगम यांचा ईजय असो. बोला सरकार आम्हाना कशाला बोलिवल हाय.
अकबर : (पुन्हा तोच कागदाचा गठ्ठा बिरबलाला दाखवत) बिरबल हे काय हाये?
बिरबल : (कागदाचा गठ्ठा हातात घेतो आणि सावकाशपणे एक-एक पान उलटत पाहतो.) बादशा सलामत, ह्यो मोशीतला एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट "बेव्हरलीक्रेस्ट" हाये. हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये आणि ह्यो समदा प्रोजेक्ट कराया अंदाजे एकशेसोला तास लागतेन!
अकबर : (बेगमकडे पाहून विजयी स्मितहास्य करीत) बघ आवरे! मी तुना पैलच बोल्लो व्हतो. बिरबल आमचा ब्येस डिटेलर हाये!
बेगम : (रागाने हातात सफरचंदाचं ताट घेते आणि भावाला मारीत सुटते.) कालतोंड्या, बावलटा, आवरा कसा येरा निघाला तू, माझी सगरी विज्जत घालीवली. तुना आता जित्ता नाय सोरत!

(मग अकबराचा मेहुणा बहिणीचा मार चुकवत पळू लागतो, बहिण त्याच्यामागे पळते आणि पडदा पडतो.)

(केवळ विनोदनिर्मिती साठी आगरी/मालवणी/कोकणी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांपैकी कुठल्याच भाषेवर माझे प्रभुत्व नसल्याने हा प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती)

- संदीप चांदणे (13/10/14)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...