Monday, June 11, 2018

बांडगूळं

बांडगूळं


बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!

संदीप चांदणे (११/६/२०१८)



No comments:

Post a Comment

देहाची तिजोरी - विडंबन

नेहा तर कमजोरी  भक्ती आरतीचा हेवा कुठून झाली बुद्धी देवा? कुठून झाली देवा? जातो नीट डोळे मिटूनी खात शेण-माती मनी भामट्याच्या का रे भीती त्या...