Thursday, November 5, 2020

तुझ्या हाळीचे गाणे

सारे काही शांत शांत
अबोल आणि खिन्न
तम दाटे भवताली
खोल काळेकभिन्न

आशा विरती जसे
शुष्क अंबरी जलद
झळाळत्या मृगजळाची
शाई डोळ्यांत गडद

कुणी दिसेना कुठेच
दाही दिशाही सरल्या
अंतरास सरावल्या
माझ्या पायाच्या खपल्या

साद एक दे जराशी
वार्‍यासवे पाठवून
तुझ्या हाळीचे गाणे
तुला देईन फिरून

- संदीप भानुदास चांदणे (२७/०४/२०२०)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...