Friday, March 18, 2022

पहाटेचा चंद्र

आज पहाटेशी मला
चंद्र दिसला तोऱ्यात
जणू तीट अंधाराला
कुणी लावला नभात

गोलाकार अति काया
रूप चंदेरी साजिरे
साऱ्या तारामंडळाला
फिके फिके करणारे

नभी नवल पाहिले
खळखळून हसताना
त्याचे रात्रीचे आयुष्य
भरभरून जगताना

- संदीप चांदणे (शुक्रवार, १८/०३/२०२२)

Thursday, March 10, 2022

मनूचे श्लोक

मनू तू सदा हासतच रहावे|
रडू कसले ते कधी न पहावे||
आवडे तुला जे नित्यनेमी करावे|
नवनवे करोनि आम्हां दाखवावे||

सकाळी योगा करायचाय म्हणावे|
परि सकाळी न कधीही उठावे||
खाताना हे नको ते नको नसावे|
बकाबका तरीही कधी न चरावे||

कामात आपुल्या मग्न होऊनि जावे|
कुणासही तू न कधी दुखवावे||
बाबाला खात्री तुझ्या आहे यशाची|
तुझ्या पायाशी सुखाने लोळण घ्यावे||

- मनूचा बाबा

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...