श ब्दांमधूनि जन्म घेऊनि
श त शब्दांचे आयुष्य पुरते
क था करते रंजन आणिक
क विता क्लिष्ट कोडे बनते
वि तभर रात्र पैज मोठी
ता रे मोजीत कविता होई
क रती वाचक त्रागा, म्हणती
ठी क मेंदू बिघडून जाई
न सावाच सोस शब्दांचा
का ही ओले पाझर व्हावे
म नास साऱ्या चिंब करूनि
रें गाळूंन मग स्वतः भिजावे
भा रंभार रचल्यावर कविता
वा चक खरा जागा दाखवतो
न सत्या यमकांना जुळवून
को णी जेव्हा कवी मिरवतो
च हाटळ कवि आपला
हा त आखडतच नाही
त्रा स जगाला देऊन
स हज काव्य पाडत राही
वा ईट काव्य लिहूनही
च कार खेद मनी नसतो
वा हवा कविराजा
म स्तीत तरीही जगतो?
ज गा आणिक जगू द्या
पा ठही रूचत नाही
म रा मरू द्या म्हणत
रा म उलटा घोकत जाई
- संदीप भानुदास चांदणे (सोमवार, ०९/०५/२०२२)