मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
Thursday, January 5, 2023
हत्ती कितीही वाळला तरी
चारेक महिने चालून पळून
रात्रीचे रोज जेवण त्यागून
मैतर भोळा मला विचारी
सांग दिसतो बारीक? पाहून
प्रश्न विचारला अति झोकात
हसू ओठी, चमक डोळ्यात
हसून घ्यावे की खरे सांगावे
प्रश्न घिरट्या घाली डोक्यात
खूप विचारा अंती शांतपणे
मांडले माझे मौलिक म्हणणे
आतापर्यंतच्या गंभीर चर्चेत
सुरू फिदीफिदी झाले हसणे
टरबूज सुकले तरी त्याला
कुणी बोर म्हणत नाहीत
हत्ती किती वाळला तरी
त्याला मोर म्हणत नाहीत
संदीप चांदणे (गुरूवार, ५/१/२०२३)
Subscribe to:
Comments (Atom)
अकबर बिरबल (बँक व्हिजीट)
अकबर बिरबल ( बँक व्हिजीट ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------...
-
गारव्याची शाल मऊ अन स्वच्छ निरभ्र नभ निळे तृणपात्यांचा मऊ बिछाना रोज न असले सुख मिळे गंधाचा हलके शिडकावा ताटव्यातली करती कुसुमे मध्येच पिवळी...
-
चंद्रावरची एक म्हातारी हळूच उतरून खाली आली कमरेत मोठा खोचून बटवा बोलली मला सूर्यावर पाठवा देईन तुम्हाला भरून सारे बटव्यामधले चमचम ता...
-
काय भुर्र्कन गेले ते दिवस! शाळेचे! कळालसुद्धा नाही! कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला ...



