एरवी कलकलणारा
कर्कश्श नीरस रस्ता
पाठ फिरवता रवीकिरणांनी
लख्ख पेटूनी उठला
यांत्रिक रथ रांगेत धावती
जणू जळते पळते पलिते
एकटक बघता त्यांकडे
जाळाची जणू रेघच दिसते
माळापलिकडे दिसणाऱ्या
अंधारात इमारती उठल्या
दिवसा ज्या धुक्यात होत्या
आता रोषणाईने सजल्या
क्षीण होईल हळूहळू
घरघर या आवाजाची
ज्योतही मंदावत जाईल
ह्या धावत्या पलित्यांची
- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, ०२/०३/२०२३)